स्वातंत्र्य म्हणजे काय?
“स्वातंत्र्य म्हणजे काय? ते इतके मोलाचे का वाटते? स्वातंत्र्याची ओढ मानवी स्वभावांत उपजतच आहे, कीं विशेष परिस्थितीमुळे घडणारा तो एक संस्कार आहे? स्वातंत्र्य हे अंतिम साध्य आहे कीं दुसरे काही संपादन करण्याचे ते एक साधन आहे – स्वातंत्र्याबरोबरच काही जबाबदाऱ्या अपरिहार्य ठरतात काय? आणि अधिक स्वास्थ्य मिळविण्यासाठी एकादा समाजचा समाज स्वातंत्र्यावर पाणी सोडायला सहज राजी …